अनेकांना विविध छंद असतात. तसाच मला वयाच्या नवव्या वर्षापासून व्हायोलीन वादनाचा छंद जडला. माझे वडील पं. भालचंद्र देव हे कै. पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य. वडीलांचे व्हायोलिन वादन सतत कानावर पडत असे त्यामुळे मी ही व्हायोलीनच शिकण्याचे ठरविले आणि तेच पुढे नेटेने पुढे नेले.
कॉलेज शिक्षण बी. कॉम. पर्यत झाल्यावर मी संगीत विषयातच एस.एन.डी.टी.मध्ये एम.ए. पूर्ण केले. पुण्यातील नामवंत संस्थांच्या कार्य़क्रमात व्हायोलीन वादनाची साथसंगत करण्य़ाची संधी मिळाली.
घरात आई-वडीलांची कडक शिस्त. त्यामुळे रियाजही अगदी नियमाने आणि तेवढ्याच जिद्दीने व्यवस्थित होत असे. आई अभंग, भजने छान म्हणत असे. त्यामुळे घरातच संगीताचे वातावरण होते.
लग्न झाल्यानंतरही माझी ही कला तशीच पुढे सुरु राहिली. माझे सासू-सासरे, दीर, जाऊ, नणंदा आणि मुख्य म्हणजे माझे पती यासर्वांनाच संगीताची खूपच गोडी होती व आहे. त्यामुळे सासरहुन माझ्या कलेसाठी खूप प्रोत्साहन मिळत गेले. माहेरी लावलेल्या संगीताच्या रोपट्याचा सासरी वटवृक्ष झाला.
मा आणि माझे वडील पं. भालचंद्र देव आम्ही शास्त्रीय वादन आणि सुगम वादन असे जुगलबंदीचे भरपूर कार्यक्रम केले आहेत. मी जवळजवळ ३००० पैक्षा अधिक कार्यक्रमामधून व्हायोलीनची साथ केली आहे.
मला देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा `संगीतसेवा पुरस्कार` मिळाला. माझे कुंदगोळचा सवाई गंधर्व महोत्सव, गांधर्व महाविद्यालाय, दादार माटुंगा क्लटरल सेंटर, शाहू संगीत रजनी, माहत्मा गांधी सेवा समिती, सप्तक संस्था, बांद्रा संगीत सभा अशा अनेक ठिकाणी शास्त्रीय संगीताचे स्वतंत्र कार्यक्रम झाले.
मी बी.एस.एन.एल.(BSNL), मध्ये ३० वर्षे नोकरी करत असून तिथल्या खात्याअंतर्गत अ.भा.स्पर्धेत सतत २३ वर्षं सुवर्णपदके मला मिळाली आहेत .
माझ्या यशाची गुढी निरंतर उंच जावी. हा कलेचा आनंद रसिकांना भरभरून देता यावा हिच परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. कोणत्याही कलाकाराची कलेची गुढी रसिकांमुळेच अधिक उंच जात असते. खरतर संगीत ही अशी गोष्ट आहे की, जी आयुष्यभर शिकली तरी पुर्ण होऊ शकत नाही. पण जी काही थोडेफार कला आहे तिचा आनंद रसिकांना देत रहावा अशी इच्छा आहे.
सौ. चारुशीला गोसावी, पुणे
charusheelagosavi@gmail.com
9421019499

No comments:
Post a Comment