Total Pageviews

Tuesday, April 28, 2015

व्हायोलीन वादनाची सुरेल मैफल


गायनाचार्य पं. गजाननबुवा जोशी यांच्या स्मृतीनिमित्ताने त्यांचे शिष्य पं. भालचंद्र देव यांनी स्वरबहारच्या वतीने व्हायोलीन वादकांची मैफल आयोजित केली होती. गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात रविवारी ( २६ एप्रिल ) रंगलेल्या या मैफलीचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या सुरवातीली पं. गजाननबूवांचे जोग रागातील ध्वनीमुद्रित व्हायोलीन वादन ऐकविण्यात आले. त्यानंतर भालचंद्र देव यांच्या कन्या आणि शिष्या सौ. चारुशीला गोसावी आणि पं. मधुकर गोडसे व रमाकांत परांजपे यांच्याकडे व्हायोलीन वादनाचे शिक्षण घेतलेल्या सौ. निलिमा राडकर यांनी मारूबिहाग रागातील सहवादन करुन वादनातील कुशलता आणि सुंदर स्वरांच्या हिंदोळ्यावर रसिकांना मोहित केले.

केदार आणि रागाश्री रागातील गतींने चाराशीला गोसावी यांनी व्हायोलिन वादनातली आपली तरबेजता स्धिद केली.. बैरागी भेरव आणि मालकंस रागातील गतींमधुन निलिमा राडकर यांनी आपले कौशल्य पणाला लावले.
उत्तरार्धात शब्दप्रदान गायकीचा नमुना म्हणून दोन्ही महिला कलावंतांनी हे सुरांनो चंद्र व्हा 
( चारुशीला गोसावी) आणि नारायणा रमारमणा (निलिमा राडकर) ह्या दोन रचना सादर केल्या.


पांडुरंग कांती हा अभंग अभय आगाशे यांनी सादर केला. त्यानंतर गासावी आणि राडकर यां दोघींनी अवघे गर्जे पंढरपूर हा अभंग एकत्रीतपणे सादर करून रसिकांच्या मनात अधिक आनंद निर्माण केला.

कार्यक्रमाची सांगता पं. भालचंद्र देव यांनी व्हायोलिनवर भैरवी वाजवून केली
रविराज गोसावी यांनी सर्वच कार्यक्रमाला अतिशय उत्तम तबल्याची साथ केली.इतर वाद्ये वसंत देव यांनी वाजविली.
सगळ्याच कार्यक्रमाचे निवेदन  राजय गोसावी यांनी नेटकेपणाने केले.



No comments:

Post a Comment