Total Pageviews

Saturday, September 28, 2013

गुरुपौर्णीमेनिमित्ताने ज्येष्ठ व्हायोलीन वादकांचा सन्मान


मुंबईतील विलेपार्ले इथल्या `गोमंतक सभागृहात` २२ सप्टेंबरला... मिलिंद रायकर अकादमीच्या वतीने ज्येष्ठ व्हायोलीन वादकांचा सत्कार आयोजित केला गेला होता. निमित्त होतो अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे. 

गुरूपौर्णीमेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या समारंभाचे तीन सत्रात आयोजन केले होते.सकाळी अकारापासून रायकरांच्या अकादमीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे व्हायलीन वादन. ह्यामध्ये त्यांनी उत्तम विद्यार्थ्याची निवड करुन त्याचा खास गौरव आयत्यावेळी केला गेला. तो कु. श्र्वेता तुलसीयानी हिला देण्यात आला.

संध्याकाळी तिस-या सत्रात पुण्यातील ज्येष्ठ व्हायोलीन वादक पं. भालचंद्र देव , मुंबईतील  बळीराम पतंगे यांचा श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव. 
आणि पुण्याचेच ज्येष्ठ व्हायोलीव वादक उस्ताद फैय्याज हुसेन खान यांना पद्मश्री जी.के.दातार यांच्या हस्ते पुरस्कार.. असा खासा कार्यक्रम होता.
या प्रसंगी पं. डी.के. दातार यांच्या पत्नी व्हायोलीनवादक सौ. सुधा दातार याही मुद्दाम उपस्थित होत्या.

सत्कार आणि पुरस्कारानंतर पं. भालचंद्र देव यांचे व्हायोलीन वादन झाले. . त्यांनी नाट्यसंगीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उस्ताद फैय्याज हुसेन यांनी राग सुहा, धुन आणि नाट्यगीत पेश करून व्हायोलीनवादनाचा आनंद श्रोत्यांना मिळवून दिला.


श्री. मिलिंद रायकर अकादमीच्या वतीने दरवर्षी हा सत्कार समारंभ आयोजित करुन..विविध ठिकाणचे व्हायोलीन वादकांचा सन्मान केला जातो. या आगळ्या गुरुपौर्णीबाबत त्याना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत. त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा...












-सौ. चारुशीला गोसावी, पुणे



.

No comments:

Post a Comment